नग्नसत्य

Started by prdhamangaonkar, April 04, 2017, 01:58:39 PM

Previous topic - Next topic

prdhamangaonkar

नग्नसत्य
माणसांची नितीमत्ता अहो..
झाली केव्हाच बेचिराख..
पेटविले त्यांनी यज्ञकुंड
होण्यास स्वत: सर्वाधिपति!!
आणि माहीत नाही तुम्हाला????
आम्हीच त्यातील आहूति....!!!!!!!!!
माणुसकी, पाप आणि पुण्य..
ही तर पुराणातील वानगी..
किती राव अज्ञानी तुम्ही..!!!!!
केव्हाच केले दफन त्यांचे....
जी उरली थोडी बहूत होती...!!!!!!
जातिवाद, धर्मांधता आणि...
राजकारण ते गलिच्छ....
लोकशाही काय उद्या जाणार सरणावर????
रोजच तर वाहून नेतोय...
आमच्याच खांद्यावर आमचेच कलेवर.....

* श्याम धामणगांवकर