अधुरं प्रेम

Started by Rahul Ghorpade, April 06, 2017, 01:32:48 PM

Previous topic - Next topic

Rahul Ghorpade

अधुरं राहिल्यालं
आपलं ते बोलणं तेव्हा
मला आज ते पुर्ण करायचयं

तु ऐकणार असशील
तर आज मला
तुला काही सांगायचं

काही प्रश्न आहेत
माझ्या मनात
त्यांची उत्तरे मला
तुला विचारायची

का दुरावा
आला आपल्यात
याचं कारण
मला तुला विचारायचं

का तु माझा
हात सोडलासं
का तु माझं
ह्रदय तोडलसं
का आपलं प्रेम अधुरं राहिलं

या सर्व प्रश्नांची उत्तरे
मला आज पाहिजे

अधुरं राहिल्यालं
आपलं ते बोलण तेव्हा
मला आज ते पुर्ण करायचयं

ऐकणार आहेस
ना गं तु आज तरी माझं
का आजही
जाणार तु मला
पाहूण न
पाहिल्या सारखं करून पुढं

मी वाट
पाहीन तुझी
केव्हा येशील तु परत
द्यायला माझ्या प्रश्नांची उत्तरं...

....राहुल घोरपडे....