'आई काय अनं बाप दाेघांचं प्रेम सारखचं'.

Started by suraj-123, April 06, 2017, 05:48:32 PM

Previous topic - Next topic

suraj-123

'आई काय अनं बाप दाेघांचं प्रेम सारखचं'.
------------------

अनेकांनी आईच्या मायेवर,
खूप कवीता मांडल्या.
अनेकांनी त्या वाचल्या.
पण,बापाचं गुणगाण कुठं हरवलं.
ते एका ठारावीक मर्यादापलीकडचं सापडत गेलं.

बाप काय असताे.
ताे कधी कुणाला कळलाचं नाही.
काहींना आई समजली.
त्यांनी फक्त आईचं लीहीली.
बाप कुठं हरवुन बसला .
कधीचं नाही त्यांना सापडला..

थाेर संतानीही आईची उपमाचं मांडली.
बापाची सावळी कुठं हरवली.
नाही कुणालाचं समजली.

आई असते मायेचीे घाघर.
तर,बाप  असताे वात्सल्याचा महासागर.
आई आपुल्या पिलांना,
पंखात ऊब देणारी असते.
तर,बाप आपुल्या पिलांना,
चाेचीत दाणे टिपुन आणणारा असताे.


बाेटाला पकडुनं शालेळा,
धाडणारा बाप असताे.
मुलाला पहाटे ऊठुन,
डबा करणारी आई असते.
लहाणपणात मुलाचं लाडं,
पुरवणारा बाप असताे,
बापानं रागात मारल्यानंतर,
छातीशी कवटाळुन घेणारी आई असते.

आई काय अनं बाप ,
दाेघांचे आपुल्या पिलांवर ,
सारखचं प्रेम असतं.
त्यांच्याबद्दल लीहावं तितकं,
कमी असतं
दाेघांचं प्रेम आपल्याला मिलनं,
यातचं सारं भाग्य असतं....
यातचं सारं भाग्य असतं....

-ज्ञानेश्वर अशाेक थाेरात.
(9075838354)
(ता.-मुरबाड,जि.-ठाणे)