रोज कुठं हरवतो मी मलाच माहित नसतं

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, April 07, 2017, 06:52:58 AM

Previous topic - Next topic
रोज कुठं हरवतो मी
मलाच माहित नसतं
स्वतः मधून बाहेर निघून
पुन्हा स्वतः हरवतो मी
शब्द हरवतात माझे
माझ्या चारही बाजूला पण
कोणत्या तरी चक्कर मध्ये
जीवन अडकल्या सारखं वाटतं
खूप वाटतं आवाज देईल कोण
तरी पण आवाज कोणाचा ऐकू
येत नाही जरी जीवनाचे हाल बदलले
तरी कुठं आपलंसं वाटणार दिसत
नाही या जगात खूप गर्दी आहे
लोकांची पण प्रेमान जवळ
करणार कोणीच दिसत नाही

✍🏻(कवी.अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.9637040900.अहमदनगर