'भिमा'....

Started by suraj-123, April 08, 2017, 04:28:52 PM

Previous topic - Next topic

suraj-123

'भिमा'....
----------

'भिमा' तुझ्या या लेखनीने,
राज्य जगावरी गाजविले.
अंधकारातुनी या तु,
शत-शतकांचे जुलुम,
    सारेचं माेडुन पाडले......

विजेपरी तु ,असा आकाशी चमकला.
नरक यातनेच्या या जिवनातुन,
सारा अंधारचं नाहीसा झाला.
तु स्वतः साेसुन अन्यायाचे घाव.
कसायाच्या दावणिला पिढ्यानं-पिढ्या बांधलेल्या
गाय-वासरांचे साेडवलेसं तु दावं.....

तुला अनेक मनुवाद्यांनी छळले.
ते सारेचं तु झुगारून,
अन्यायाचे पंख छाटीले.
स्वतःचे सुख विसरुनी,
इतरांस आनंदाचे दिसं वाटीले.

आता सारेचं तुला का, विसरले.
ऋण तुझे हे कसे फेडावे.
कळत नाही आता मला.....
कळत नाही आता मला.....

                   -ज्ञानेश्वर अशाेक थाेरात.
                   (9075838354)
                  ( ता.-मुरबाड,जि.-ठाणे.)