विरह

Started by Rahul Ghorpade, April 08, 2017, 07:59:28 PM

Previous topic - Next topic

Rahul Ghorpade

चालत होता मी
एकटाचं रस्त्याने
अंधार पसरलेला
होता सगळीकडे
मला वाट एकटीचं दिसत होती...

चालताना त्या
वाटेवर मला
साथ तुझ्या
विरहाची होती...

आठवत होतो तुझ्या
भेटीचे ते क्षण
जेव्हा साथ
मला तुझी होती...

आठवणीतल्या त्या
क्षणामध्ये मला
जाणीव तुझ्या
विरहाची होत होती...

तुझा विरह
माझ्या डोळ्यात
पाणी आणत होता
एक एक पाऊल
माझं माग ओढत होता...

....राहुल घोरपडे....