बोलाविले म्हणून....!!

Started by श्री. प्रकाश साळवी, April 08, 2017, 08:40:43 PM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी

बोलाविले म्हणून....!!
----------------
बोलाविले ओठांनी तुझ्या आसवे ही प्यायला
आतुरलेल्या नयनांनी हि अमृत मिठी ल्यायला
**
बघ गंध ही गंधाळला तुझ्या बहरल्या प्रीतिने
काय मोग-याने फुलावे धुंद गंध व्हायला
**
मी चांदणे पिऊन आलो तु चंद्रिका होशिल का?
पाखरांचे पंख लेउनी प्रीतित गाणे गायला
**
धाडीले शब्द माझे की तुला शोधावया
येशील का तु गंधुनी फेर धरूनी नाचायला !
**
हे गीत माझे गाऊ लागले ती प्रीत ग
अन अंतरिचे बोल माझे लागले डोलायला
**
प्रकाश साळवी
०८/०४/२०१७
०९१५८२५६०५४