* वादळे *

Started by कवी-गणेश साळुंखे, April 08, 2017, 10:30:43 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे


गंध तुझ्या देहाचा सखे
अजुनी या श्वासात दरवळे
दुराव्याचे वाढले जरी अंतर
तरी रक्तात तुच सळसळे

थांबुनी वळणावरती काय होते
पुन्हा तुझ्या आठवणीच छळे
रोजचाच हा खेळ नेमाचा
जो कधी ना टळे

नाहीस तु आज जवळी
म्हणुन काळीज ही कळवळे
बंद पापण्यात माझ्या मग
आज थैमान घालती वादळे.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938