जे पाहतो डोळ्यांनी

Started by कदम, April 09, 2017, 11:06:06 AM

Previous topic - Next topic

कदम

जे पाहतो डोळयांनी,
जग ते खरे नसते....!

दृष्टीपटलावरचे हवे हवे,
असे एक चिञ असते...!

अंतरंग मनाचे मागते जे सुख,
त्या सुखाकारणी मंतरलेले नुसते..!

नयनामध्ये उमटणारे प्रतिबिंब,
जसे विरोधी असते,जीवन ही असेच भासते

हृदयास जे प्रेरक,कारक असते
आशी दृश्ये पाहूनच बरे वाटते

मुळात सर्व पाहायचं का?फक्सतं
भरभरून अवगतत,भटकायचं जगी समस्त

पाहुन डोळयानी होतसे मनी संग्रहस्त
भाग त्यांचा होताना एक,अंग अंग भयग्रस्त

द्रारिद्र,श्रीमंतीतले फरक,डोळे शोधू लागत
अंधारी येते मग त्यामागून चालत

जग जे दिसते ते,जरी खरे असले,
पांघरलेल्यागत उजेडाने काळोख दिसते