माझी आई .By.....सौमित्र ( किशोर कदम )

Started by sachinkagre, January 21, 2010, 11:51:23 AM

Previous topic - Next topic

sachinkagre

आईला वाटत असेल की सकाळी रिकामाच तर बाहेर पडतो हातां सोबत ,
पण कुठल ओझ घेउन परततो  हा रोज रात्री.
आईला वाटत असेल कुणास ठाउक काय करतो,
कुठे असतो दिवसभर, काय काय भरून नेतो जाते वेळी,
पुस्तक, पेन, कोरे कागद, न्यापकिन, पेस्ट, टूथब्रश, औषध कुठली,
परवा तर अंडर वेअर भरून घेतली ब्यागेत त्याने जणू तो परतणारच नाही रात्री घरी
विचाराव म्हणून पुढे व्हाव तर घाई घाईत काहीतरी शोधायला लागतो
कधी कधी बाहेर पडून नाक्यवारून परत येतो
उघडतो कपाट, फोडतो कुलाप, पुस्तक धुन्डाळतो, खीसे चाचपदतो उद्विग्नपने
घरात त्याच काय हरवलय आणि कधी, काही कळत नाही
प्रश्न घेउनच बाहेर पडतो तेव्हा हरवलेल सापडले की नाही हेही पुन्हा समजत नाही
कधी तरी अवचीत संध्याकाळीच परततो ,
गप्प मलूल बसून राहतो, मला पाहतो तेव्हा पाहतो मलाच अस बिलकूल वाटत नाही
काय झालय रे तुला अस विचारावस वाटत पण निसट्ल्यागत पिंज-यामधून भुर्र दिशी उडून जातो,
जेव्हा परतो, मध्यरात्रीचा प्रहर मंदपणे सरकत असतो त्याच्या माझ्या वयावरून
उपास, तापास, पूजा, अर्चा सांगुन कधी केली नाही
पण हल्ली लाईट घालवून कलोखात हात जोडून काही तरी पुट पुट ताना दिसतो

--------------------------------------------------------------------
माझी आई .
सौमित्र ( किशोर कदम )

santoshi.world

kedar anmole