राधिके

Started by विक्रांत, April 09, 2017, 10:41:13 PM

Previous topic - Next topic

विक्रांत


हासतील तुला सारे
ठेवतील नावे सारे
भोवताली आग वारे
तू नकोस मना घेवू

प्रीत केली राधिके तू
नाकारुनी जगास तू
शब्द अभद्र अतृप्त 
तू नकोस कानी ऐकू

कृष्ण सखयाची प्रीती
भाग्यवान आहे किती
आले काय गेले हाती
तू नकोस कधी पाहू

दे धार्ष्ट तुझे श्यामला
बंड आवेग मनाला
पदी ठेवी जीवनाला
तू नकोस दूर जावू

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने
http://kavitesathikavita.blogspot.in



राधिके
हासतील तुला सारे
ठेवतील नावे सारे
आग असे भोवताली
तू नको मनावर घेवू

प्रीत केली राधिके तू
जग धुडकावून सारे
शब्द अभद्र अतृप्त
तू मनावर नको घेवू

प्रीत कृष्ण सखयाची
भाग्यवान आहेस तू
आले काय गेले हाती
तू मनावर नको घेवू

दे धार्ष्ट तुझे ग मला
बंड आवेगी मनाला
पायी वाहीन जीवन
दिल्यावीण नको जावू

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने
http://kavitesathikavita.blogspot.in