प्रस्ताव

Started by amoul, January 21, 2010, 01:52:06 PM

Previous topic - Next topic

amoul

सुरुवात नव्हती त्यामुळे सांगताही नव्हतीच कश्याची,
आखलेले बेत नव्हतेच, सारे घडत काही निराळे होते.

एकांत हक्काचा नव्हताच कि तोही स्वाधीन कुणाच्या होता,
चिंब भिजलेले क्षण सारे, विसरलो कि कधी इथेही उन्हाळे होते.

प्रश्न  न   विचारताच   काय आहे उत्तर ठाऊक होते,
उगाचच लटका नकार तो,  मनात होकाराचेच उमाळे होते.

शब्दांपेक्षाही पुरेसे होते  नखरेल, भाव  खट्याळ  डोळ्यातले,
गणित तर केव्हाचे सुटलेले, तपासायचे केवळ पडताळे होते.

..............................अमोल

santoshi.world

wahhhhhhhhh kai oli ahet hya ........ so romantic ;) .......... chhan ahe kavita :)

प्रश्न  न   विचारताच   काय आहे उत्तर ठाऊक होते,
उगाचच लटका नकार तो,  मनात होकाराचेच उमाळे होते.

शब्दांपेक्षाही पुरेसे होते  नखरेल, भाव  खट्याळ  डोळ्यातले,
गणित तर केव्हाचे सुटलेले, तपासायचे केवळ पडताळे होते.