haravla kuthe tu bhet na...

Started by tulsi, April 13, 2017, 05:29:18 PM

Previous topic - Next topic

tulsi

खूप दिसतात पण,
तुझ्यासारखं कोणी दिसलाच नाही.
एका नजरेत माझं वाटावं असा कोणी भेटलंच नाही.
कधी संपेल शोध हा?
स्वप्नातच का?  खरोखरहि तू कधी भेट ना,..
एकटी पिंजऱ्यात मी तू बांध सारे तोड ना.
निरास आयुष्याचे माझ्या अर्थ तू बदलावं ना
या शांत कवितएचं गाणं तू होऊ दे ना..
स्तब्ध झालेल्या तारेमध्ये तरंग जरा छेद ना
.गुंतलीये माझ्यातच आज वर थोडी तुझ्यातही हरवू दे ना.
माझ्या प्रेमाचं कोड तुझ्यातच उलगडू दे ना.
.शेवटी सागरातच विरायचंय पण त्या आधी थोडं वाहू दे ना..
दिवस सरन्या आधी जागून घेऊ , ओझरत्या या क्षणांना तू थांबावं ना ....!!!