माय झाली......

Started by masterkr, April 13, 2017, 05:53:57 PM

Previous topic - Next topic

masterkr

माय झाली....

कोवळ्या गीतास आता भावनेची साथ आली
चंदनाशी गाठ पड़ता तीच माझी माय झाली

तिन लोके नमन करीसी चांदणे ह्रदयात न्हाली
कष्टाळल्या जीवनाची तीच माझी माय झाली

गुंफीतांना दुःख जेव्हा ती सुखाची ढालं जाहली
अमृताच्या गोडव्याची तीच माझी माय झाली

भावना दाटुन येता आसवांची धार झाली
करुणेच्या सागराची तीच माझी माय झाली

अंधारल्या आलयाला ती दिव्याची वात झाली
चिरकाल सौभाग्याची तिच माझी माय झाली

                ____केदार जोशी
                    जळगांव जामोद
                    9130838443