सांगायचं आज तुला काही

Started by Rahul Ghorpade, April 13, 2017, 08:39:32 PM

Previous topic - Next topic

Rahul Ghorpade

आज मनातलं सगळं
आपण सखे
ऐकमेकांना
बोलूनचं टाकू...

आपल्या भावनांना
आपण आज
शब्दांतचं मांडू,

प्रेम स्पर्श तुझा
सखे माझ्या
ह्रदयाला
गहिवरून टाकतो
मी माझाचं
असताना ही
मला तुझा करून जातो....

तु माझ्या
सोबत नसताना
तुझा विरह मला
अबोल करून जातो,

तुला शोधत असताना
मन माझं उंच
शिखरा वरती जातं
वाहणा-या या वा-यांना
तुझा पत्ता विचारत बसतं...

पावसाचा प्रत्येक थेंब
जसा तुझ्याचं
साठी बरसत असतो
अंगाला स्पर्शून
तुझ्या तो त्याचं
अस्तित्वचं विसर असतो...

....राहुल घोरपडे....