शोधयायच आहे तुला. ..

Started by Prem Mandale, April 14, 2017, 09:35:09 AM

Previous topic - Next topic

Prem Mandale

शोधयायच आहे तुला
शब्दांच्या ओघात. .. 😊
दडून बसलेल्या माझ्या
ह्रदयाच्या कोपऱ्यात. ..
.
शोधायच आहे तुला. .
भिरभिरत्या त्या
डोळ्यात. ..
मला पाहून झुकलेला
त्या नजरेत... 😊
.
शोधायच आहे तुला
निरागस पडलेल्या त्या
पाऊसात. ..
तुझ्या गालावरून घसरलेल्या
थेंबात. .. 😊
.
शोधायच आहे तुला. ..
चिखलात उमललेल्या
कमळात...
तु चिखल पाहून मुरडलेल्या
नाकात. .. 😃
.
शोधायच आहे तुला. ..
तुझ्या थरथरत्या
ओठांत...
तु मारलेल्या घट्ट मिठीत... 😊
.
शोधायच आहे तुला. ..
माझ्या काळजात. ..
तु जवळ आल्यावर
धकधकणार्या ह्रदयाच्या स्वरात... 😊
.
शोधायच आहे तुला. ..
तुझ्या त्या नकट्या
नाकात...
रुसलेल्या तुझ्या त्या चेहऱ्यात... 😊
.
स्वलिखीत :: Prem Mandale
१४/४/२०१७
९९६०३५१४३६