सांग सखे तुला विसरू कसा

Started by Devendra Parte, April 14, 2017, 09:59:28 AM

Previous topic - Next topic

Devendra Parte

प्रेमाचा या वाटेवर
मला एकटं करुन गेलीस
जाता जाता मागे फक्त
आठवणी सोडून गेलीस

माझं काय गं सखे,
सावरेण कसाही मी स्वतःला
पण मनाचा या हट्टाने
अगदी असहाय्य केलय मला

कधी कधी वाटतं
तुला कायमचं विसरुन जावं
मनातून या माझा
तुला कायमचं काढून टाकावं

वाटतं तुला विसरतोय
तोच वळण असे येते
आठवणींच्या रूपाने पुन्हा
तूच समोर येतेस

फिरतोय या वाटेवर
एक भटकंती फिरतो जसा
तूच सांग सखे
तुला विसरू तरी कसा

          - देवेंद्र पार्टे