तू असतास तर

Started by tulsi, April 14, 2017, 11:39:42 AM

Previous topic - Next topic

tulsi

 :(
तू असतास तर कवितेला या असता अर्थ
तुझ्याविना पानांतच होतेय व्यर्थ..

तू असतास तर नटण्याला या असता अर्थ
आता हे रूप माझं माझ्याच डोळ्यात सलंतं

तू असतास तर मन हे जरा बावरलं असतं
आता दडलं गाभाऱ्यात होऊन शुष्क

तू असतास तर वेळेचं भान हरवलं असतं
आता कठीण झालं एक एक क्षण वेचणं

तू असतास तर केले असते पुष्कळ हट्ट
अस तर कोणी ऐकतहि  नाही माझं गाऱ्हाणं

तू असतास तर रंगवली असती स्वप्नं
आता या डोळ्यांत उरलाय कोंदण अश्रूंचं