.........तर.............कशाला....... ??

Started by tulsi, April 14, 2017, 11:42:21 AM

Previous topic - Next topic

tulsi

जोडले हे नते  जन्मांतरीचे तर
अनोळखी कसा तू मला .......  ??

नजराच  जर वाचतील मनं  तर,
शब्दांची उठाठेव कशाला.......  ??

चाहुलीने तुझ्या खुलतो चेहरा तर
खोटा नखरा हवाय कुणाला  .......  ??

प्रेमाला या विश्वासाची बांधिलकी तर
संशय अन गैरसमज उरतील तरी कशाला  .......  ??

आठवणी तुझ्या अंथरल्यात मनात तर
विरहाचं विरजण मागेल का नात्याला .......  ??

तुझ्यातच सामावलंय सुख सारं तर
मृगजळाचा हव्यास करू कशाला .......  ??

तुझ्या सोबतीत साजरे होतात  क्षण सारेच
तर मग आता मरणाची भीती कशाला .......  ??