कधी कधी वाटतं मनाला

Started by yogita ghumare, April 14, 2017, 02:14:22 PM

Previous topic - Next topic

yogita ghumare

कधी कधी वाटतं मनाला ,
निसर्गरम्य अशा संध्याकाळी ,
दूरपर्यंत ओसाड पडलेल्या समुद्रकिनारी ,
पायांचे ठसे उमटवत चालावं ,
लाटांच मधुर संगीत ऐकावं ,
दूरवर पसरलेलं सोनेरी आकाश पाहावं ,
कधी कधी वाटतं मनाला
एखादी जलपरी व्हावं ,
निळसर समुद्रातील अद्भुत जग पहावं ,
मोत्यांसारखं शिंपल्यात राहावं ,
कधी कधी वाटतं या मनाला ,
अशी चित्र विचित्र का होईना
पण स्वप्नंही पाहावं ,
कधी कधी वाटतं या वेड्या मनाला ,
नेहमी स्वप्नांच्याच दुनियेत राहावं .....

           
                                             - योगिता घुमरे