प्रेम का बरं करावं

Started by yogita ghumare, April 14, 2017, 09:27:29 PM

Previous topic - Next topic

yogita ghumare

आपण प्रेम का बरं करावं ?
एखाद्याच्या आठवणीत का बरं झुरावं ,
का बरं एखाद्यसोबत बोलण्यासाठी ,
तासंतास फोन घेऊन बसावं ,
का बरं एखाद्यावर प्रेम करत राहावं ?

काय मिळणार प्रेम करून
दुःखांशीवाय काहीच नाही
मग तरीही का एखाद्यासाठी
दुःख झेलत राहावं
का म्हणून आपण एखाद्यावर प्रेम करत राहावं

काय भरवसा समोरच्याचा
तो विश्वासघात करणार नाही
आला एखादा दुःखाचा प्रसंग
तर साथ आपली सोडणार नाही
मग तरीही का आपण
या अविश्वासाच्या दुनियेत
अंधल्यासारखं जगावं
का बरं आपण एखाद्यावर एवढं प्रेम करावं ...

                                      - योगिता घुमरे