फक्त तुझीच मी...!

Started by Ravi Padekar, April 14, 2017, 11:13:17 PM

Previous topic - Next topic

Ravi Padekar

देऊन टाकले हृद्य तुला
आता मी न माझे उरले
हात कसला मागतो वेड्या
संपूर्ण तुझीच मी झाले
झाले वेडी प्रेमात तुझ्या
माझे मला न कळले...

पाहिले तुझ्या नयनी मी सागर
त्यात मी विरघळले
फुलाप्रमाणे घेतले मिठीत
मी हि थोडे दरवळले
झाले वेडी प्रेमात तुझ्या
माझे मला न कळले...

- रवि पाडेकर (मुंबई)