शापित

Started by पल्लवी कुंभार, April 15, 2017, 10:52:36 AM

Previous topic - Next topic

पल्लवी कुंभार

न जाणे किती दडपले आहेत आवाज
अंधारकोठडीतल्या दारापल्याड
दबले आहेत टाहो, किंकाळ्या
अन अनावर अश्रू, हिंस्र शिक्षांचे
उमटले अनेक घाव
मीठ चोळून मारलेल्या चाबकाचे
जीर्ण पिंपळ झाड आहे
साक्ष मरण आहुतींचे
सात दिशांत पसरले
पाश आंध्रातल्या खोल्यांचे
लागले केव्हाचे डोळे
आशेच्या कवडशाचे
जरी कैद झाले वीर
सडलेले अन्न देणाऱ्या इंग्रजांचे
तरी बुलंदी आवाज घुमतायत
आझादी चे आझादी चे 

in memories of cellular jail, Andaman
-- पल्लवी कुंभार