तुझ्यासाठी वेळचं नाही

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, April 16, 2017, 06:42:55 AM

Previous topic - Next topic
तुझ्या जवळून गेलो
तरी आता तुला
खबर होत नाही
कधी काळी जिला
माझ्या सोबती शिवाय
दिवस जात नव्हता
तिला आज नुसतं
स्वप्नात मी पाही
खूपच बदल झाला
तुझ्यात आता दिवसभर
माझ्या शी बोलणारी
तू आज बोलते माझ्याकडे
तुझ्यासाठी वेळचं नाही
माझी नेहमीच काळजी करणारी
तू आज चक्क बोलली
तुझी काळजी करायला
माझ्याकडे वेळचं नाही
हळुवार स्पर्शातून मी
फक्त तुझी आहे असं
बोलणारी ती आज
दुसऱ्या कोणाच सुंदर
जीवन जगण्यासाठी
त्याच्या सोबत राही
मनाला खूप दुःख होत ओ
पण या मनातलं मनातच राही


✍🏻(कवी.अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.9637040900.अहमदनगर