ही गझल !!

Started by श्री. प्रकाश साळवी, April 16, 2017, 04:26:53 PM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी

ही गझल !!
---------
किती वाटते हो शिकावी ही गझल
नाही सोपी एव्हढी मराठी ही गझल
**
प्रथम लागतो पट्टीचा कवी तो
तयास थोडी समजेल ही गझल
**
तुझ्या त्या ईशा-यास कोणते नांव देऊ ? 
बाजूस उभे रहाण्या तुझ्या थरथरते ही गझल
**
बाद्शहाच होता तो या गझलांचा
सुरेश भटांना च पावली ही गझल
**
रदीफ, काफीया, परिभाषा गझलेची
वृत्त अलामत यमकांनी नटते ही गझल
**
तोंड वेंगाडून कशी हासते ही गझल
घ्या जाणत्यांनो सांभाळून ही गझल
**
प्रकाश साळवी
१६-०४-२०१७
०९१५८२ ५६०५४