तुझी आठवण येत आहे🎼🎼🎼

Started by maddy pathan, April 18, 2017, 01:40:42 AM

Previous topic - Next topic

maddy pathan

प्रिये तू माझ्या आयुष्यात आली,
प्रत्येक क्षणाला महत्त्व आलय
श्वासग्नि साठवलेली आठवण,
आणि अबरुत्वाचे सारे क्षण जे तू माझ्या पुढ्यात घातले,
त्याच मोल शब्दात मांडण्यासारख नाही,

एवढं मात्र नक्की

तुझ्याविना मी - मी अपूर्ण आहे,
तुझी जन्मों जन्मी साथ हवी एवढंच आज मागण आहे.

______________________________

तुला वज केल्यावर मी बाकी काही उरत नाही,
तुझ्या शिवाय आयुष्य मी आयुष्यच धरत नाही.

________________________________

तू गेल्यावर वाटत खुपस सांगायच होत,
तू खुपस काही दिल तरी आणखी मागायच होत.

_______________________________

मुक-मुक राहून तुझ नुस्तच पाहत राहन,
जस गोठलेल्या नदीच बर्फाखालुन वाहण.

________________________________

तू माझी आसन किती छान आहे,
नाहीतर हे जग म्हणजे नुस्तच माणसाचं रान आहे.

________________________________

तुझ्यावर रागवन हा तुला आठवण्याचा बहाना आहे,
तू आलीच की तो जातो असा मझा राग शहाणा आहे.

______________________________

तुझी आठवण हा नित्य नवा अनुभव आहे,
कधी उसळणार वादळ तर कधी पाकळी वरचा दव आहे.

______________________________

तू सोबत असलिस की मला मझा ही आधार लागत नाही,
तू फक्त सोबत रहा मी दूसर काही मागत नाही.

______________________________

कोणीतरी लागत आपल्याला वेडा माननार,
वेडा मानतांना अपल्यातल शहाणपण जाननार.

_____________________________

ओठात गुदमरलेले शब्द अलगद डोळ्यांकडे वडले,
पापन्या जरा थर-थरल्या म्हणून गुपित तुला कळले.

_____________________________

तुझ आठवण ही मला किती सहन काराव लागत,
उर भरून श्वास घेऊन पुन्हा गुदमराव लागत.

______________________________

तुझ हे नेहमीचच झालय आल्या आल्या निघन,
मी जाते मी निघते म्हणतांना मी थांबवतो का ते बघन.

_____________________________

एकदा वाटल तुला स्पष्टच सांगावे मग वाटल कागदावर लिहाव,
नंतर म्हटल जाउदे तुझ तुलाच कळते का ते बघाव.

_____________________________

खुपदा तुझ्या आठवणी पावलाने वजावता येतात,
खुपदा तुझे गरम श्वास कानामागे जानवतात.

___________________________
पाण्या मधल्या साखरे प्रमाणे विर्घळुदे तुझ्या प्रेमात,
ओठावर येवूदे जे दडले तुझ्या मनात.
________________________________

नजर तुला शोधत राहते तू दिसे पर्यन्त,
मग पापन्या आड़ लपून रहते तू समोर असे पर्यन्त.

________________________________

गप्पच् रहाव असे वाटत तुझ्या जवळ बसल्यावर ,
वाटते तूच सगळ ओळखाव मी नुसत हसल्यावर.

____________________________

मला वाटत मी रुसल्याव तू हळवि समजूत काढावि,
माझ्या गालावरचि खळी मग तुझ्या ओठा आड़ दडावि.

______________________________


रास्ता वळण घेत गेला पाऊल त्यावर पडत गेली,

आपल्या दोघातली प्रत्येक घटना अशी न ठरवता घडत गेली.

_______________________________

वाटल तुला चोरून भेटतांना कोणी माला बघाव,
आणि त्याच्या देखत मी तुझ्या सेव निघाव.

_____________________________

पुस्नार कोणी असेल तर रडण्याला अर्थ आहे,
जर तुझे डोळेच झरणार नसतील तर मरण सुद्धा व्यर्थ आहे.

_____________________________

माझ मन तुझ्या प्रेमात बूड़त होत ते बुड़ताना सार जग पाहत होत,
मदतीला फक्त तुझच मन धावल होत पण तुला तरी कोठे पोहायला येत होत.

________________________________

वादळांना भेटून ही जीवन अगदी संत आहे,
मीच मला भेटत नाही हीच मोठी खंत आहे.

_______________________________

स्वप्नातील पाऊलांन चलने कधी कळलेच नाही ,
पाऊल वाट चांगली असली तरी पाऊल हे वळलेच नाही.

______________________________

तुझ्यावर कविता करण मला एक आव्हान आहे,
तुझ्या प्रेमळ भावनानपुढे माझा प्रत्येक शब्द गहान आहे.

_______________________________

प्रेम करण म्हणजे एक-मेकांकडे पाहणे नाही,
तर दोघांनी मिळून एकाच गोष्टींकडे पाहणे.

मॅडी ला तुझी आठवण येत आहे 🎼🎼🎼🎼🏻.