मला तू मनापासुन आवडतेस

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, April 19, 2017, 06:29:44 AM

Previous topic - Next topic
मी विचारल्यावर हळुच
गालात का हसतेस
उघड कधीतरी हे रहस्य
ही कसली जादू केलीस
तुझ्यातच माझं मन रमत
तुझ्याकडे पाहिल्यावर ते हसत
समजुन का घेत नाहीस
मला तू मनापासुन आवडतेस
तुला पाहील्यावर २ सेकंद
का या हृदयाचे ठोके थांबवतेस
का तू माझ्या श्वास घेण्याला
मध्येच अडवतेस
मला तु नाही म्हटलीस तरी
मला वाईट नाही वाटणार
अन हे आपलं नातं
असंच मध्ये मी नाही सोडणार
जरी तू विसर बोललीस
तरी मी तुला नाही विसरणार
कारण माझं प्रेम आहे तुझ्यावर
माझा श्वास घेणं थांबवण
आता मला नाही जमणार

✍🏻(कवी.अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.9637040900.अहमदनगर