पाहिले जेव्हा तुला

Started by Devendra Parte, April 19, 2017, 08:40:58 AM

Previous topic - Next topic

Devendra Parte

पाहिले जेव्हा तुला
तेव्हा राहिलो नाही मी माझा
आता पाहिले चहूकडे मी
तरी दिसे चेहरा फक्त तुझा

पाहिले जेव्हा तुला
तेव्हा वाटले जनू परीच समोर आली
अप्सरा देखील या परी समोर
आता फिकी पडू लागली

पाहिले जेव्हा तुला
तेव्हा जीवात जीव आला
जगणं विसरलेल्या या मनाला
जगण्याचा नविन आधार मिळाला

पाहिले जेव्हा तुला
तेव्हा वेड लागले या मनाला
काय होतय त्यास विचारले
तर हिच तुझी "जुलिएट" म्हणाला

पाहिले जेव्हा तुला
तेव्हा समजले प्रेमात पडणे काय असते
दे हातात हात माझ्या
चल अनुभवू खरे प्रेम काय असते

           - देवेंद्र पार्टे


जयवंत रावल

जयवंत रावल
[url="http://ranksheet.com/Profiles/Jaywant"]http://ranksheet.com/Profiles/Jaywant[/url]