आता कोणासाठी जगू

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, April 19, 2017, 09:58:40 PM

Previous topic - Next topic
आता कोणासाठी जगू
कोणासाठी स्वप्न पाहू
जीवन जगत होतो
जिच्यासुखा साठी
तिचं राहिली नाही
आता माझ्यासाठी
काय माहित होतं
माझ्या वर तिचं
प्रेम असतांना असं
अचानक  विरेल
जीवनाची मखमली
पाय वाट चालत असतांना
ती असे जीवनात
माझ्या काटे पेरेल
शेवटचा तो क्षण असा होता
त्या क्षणी हात सोडलास
आता काय करू मी
आता कोणावर विश्वास धरू मी

✍🏻(कवी.अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.9637040900.अहमदनगर