वेगळा

Started by Rahul Ghorpade, April 19, 2017, 10:49:59 PM

Previous topic - Next topic

Rahul Ghorpade

माझ्या अश्या
स्वभावामुळे माझं
कुणाशीचं पटत नाही...

दुस-यांपेक्षा जरा
वेगळा आहे मी
म्हणून माझं
कुणाशीचं पटत नाही...

का हो जरा रागीटं असलो
चिडचिडा असलो
तर काय माझ्याकडं
भावना नाहीत का....

काळजी मी
त्याचीचं करतो
जो त्या
काळजीचा पात्र आहे...

मला जो
समजून घेतो
त्याच्यावर मी
जीव ओवाळून टाकतो....

आहे मी जरा
इतरांपेक्षा वेगळा
म्हणूनचं आहे एकटा....

♥....राहुल घोरपडे....♥