जगण्याची प्रेरणा...

Started by swapnil_123, April 20, 2017, 01:50:16 PM

Previous topic - Next topic

swapnil_123

दु:खाशी नातं येथे जन्मताच जुळते
सु:खाची भेट मात्र क्वचितच घडते
तरिही क्वचितच्या या भेटीसाठी
मनं सतत झुरत राहतं
कारण जीवन आहे हे... असचं जगावं लागतं

अपयशाचे तीक्ष्ण घाव मनं कित्येकदा झेलत जातं
आयुष्यातल्या खाचा-खळग्यात पडुन ते ठेचत राहतं
तरी आशेच्या मागे वेडं मनं सतत धावत फ़िरतं
कारण जीवन आहे हे... असचं जगावं लागतं

व्यवहारी या दुणियेत मानसं
मानुसकी विसरुन जगतात
मुखवट्यांच्या गर्दिमधे
भावनांचा लिलाव मांडत फिरतात
तरि मायेच्या कनभर ओलाव्यासाठी काळिज तडपत राहतं
कारण जीवन आहे हे... असचं जगावं लागतं