माझ्या भावना

Started by Rahul Ghorpade, April 20, 2017, 04:08:15 PM

Previous topic - Next topic

Rahul Ghorpade

तु माझ्या नजरे
समोर नसल्यावर
भावना माझ्या
ह्रदयातचं गुदमरतात...

तु येताचं नजरे
समोर
भावना माझ्या
कळी सारख्या उमलतात...

शब्द बनून
भावना माझ्या
ह्रदयातून ओठांवर येतात,

सावरता येता येत नाही
मला माझ्या
भावनांना
मग काव्यरूपी
त्या बरसू लागतात...

♥....राहुल घोरपडे....♥