निळूल्या ज्योतीचा (डॉ.बाबासाहेब आंबेडकर)

Started by विक्रांत, April 20, 2017, 08:25:57 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

निळूल्या ज्योतीचा

निळूल्या ज्योतीचा | निळूला प्रकाश|
भरले आकाश | अंतरीचे ||१ ||

तुवा दिले दान | सरले अज्ञान |
दु:खाचे प्रांगण | आक्रसले ||२ ||

अजुनी तरीही | आहे काही सल |
मनात शेवाळ | द्वेषाचे त्या ||३ ||

आपुलेच परी | किती दुरवरी |
तुटले अंतरी | आप्तजन ||४ ||

तुवा देवपण | देते जन मन |
सहिष्णुतेवीन | दिसे मज  ||५ ||

विक्रांत हा अज्ञ |पायी ठेवी माथा |
दिसो काही वाटा |बंधुत्वाच्या ||६ ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in