दत्ता उतराई

Started by विक्रांत, April 20, 2017, 08:42:48 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

दत्ता उतराई
कसा होवू तुझा
आले काही काजा
जीवन हे ||१

केल्याविन काही
होत जरी नाही
करणे तू तेही 
झाला माझा ||२

केली सारी आशा
तुझी जीवनात
भोगात लोभात
लिप्त जरी ||३


एवढेच पुण्य
असे काही गाठी
झाला तयासाठी
दाता प्रभू ||४

प्रभू जी भरलो
जीवन पातलो
किरण जाहलो
प्रकाशाचा ||५

उरले नाटक
विक्रांत ओढतो
दत्ता विचारतो
ठीक ना रे ||६

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने
http://kavitesathikavita.blogspot.in