नजर तुझी

Started by Rahul Ghorpade, April 21, 2017, 03:07:43 PM

Previous topic - Next topic

Rahul Ghorpade

इशारा तुझा आज मज
खुणवत होता काही
ह्रदयाला स्पर्श तुझा
सांगत होता काही...

तु माझ्याकडं पाहत जाऊ
नकोस अश्या नजरेनं
ह्रदयातली स्पंदने चालतात
मग माझी मंद गतीनं...

पाहूनी तुला बावरतं
माझं वेडं मन
घेऊनी मज जात मगं
स्वप्नातल्या दुनियेतं....

तु जवळ असल्यावर
मज भासत वेगळं
श्वासांमधी दरवळत
तुझं प्रेम मग हळूचं...

सांगूण टाकावसं वाटतं
मज तुला काय
चाललय
माझ्या ह्रदयातं...

भिती वाटती गं
सखे मज आता
तुझ्या दूर जाण्याचं...

♥....राहुल घोरपडे....♥