चार ओळी..............

Started by marathi, February 07, 2009, 11:08:24 PM

Previous topic - Next topic

marathi

१) तिच्या पाणावलेल्या डोळ्यांत
मला अनेक प्रश्न दिसतात,
आणि तेच प्रश्न मला
प्रेमरुपी कोडयात घालतात......
संतोष नार्वेकर.........

२) तुझ स्पर्श मला
नविनच जाणवला,
कधीतरी सांडून
पुन्हा नव्याने गावलेला
संतोष नार्वेकर ...........

३) पापने लवते न लवते
तोच तुझी आठवण,
हातात जरी नसली तरी
मनात तुझी साठवण........
संतोष नार्वेकर

४) मला ठाऊक आहे
तुझं मला वलून वलून बघणं,
ओठांवर जरी नसलं
तरी मनात माझं असण..........
संतोष नार्वेकर........

५) वड़ाच्या पारमब्यांचं
जमिनीवर प्रेम होतं,
त्या दोघांचं मिलन होऊ नये
म्हणुन वड़ाचं झाड़ वाडत होतं........
संतोष नार्वेकर.........

marathi

६) आता नका सांत्वन करू,
त्याचा काही उपयोगही नाही.
त्या गोष्टी मी केंव्हाच विसरलो,
आता त्याचे दु:ख देखिल नाही....
संतोष नार्वेकर...........


मला सांग विसरेन कसा?
तुझ्यासोबत हसलेलो
हसत हसतच गेलीस तु
आणि मी मात्र फसलेलो

संतोष (कवितेतला)



घाव मजला देऊनी, गेला निघोनी मोगरा
जखमा सुगंधी ठेऊनी, गेला निघोनी मोगरा
का आता रडणे रडावे, कोरड्या डोळ्यांतुनी ?
वाट करुनी कोरडी, गेला निघोनी मोगरा

संतोष (कवितेतला)



मोगराही का असा तुसडेपणाने वागला ?
बोलतांना गुज आतील का अचानक थांबला
ती आता गेलीच निघुनी काय मी सांगु कथा ?
मोगऱ्याला गंधवेड्या अन मला ...
हळव्या व्यथा

संतोष (कवितेतला)



निरुत्तरांना उत्तर देण्या
हाक तुम्हाला मीच दिली
प्रतिसादांचे हुकले नेम
शब्द उचलुनी घ्याच बळी
संतोष (कवितेतला)



कवितांच्या दुनियेत
कवितांच्या दुनियेत
किती मजा असते,
एकट एकट वाटताना
अखी दुनिया बरोबर असते...........
संतोष नार्वेकर..............


सखे कशी विसरशील तू
सखे कशी विसरशील तू
आठवणी तुझ्यात माझ्या गुम्फलेल्या,
पारम्ब्यांच्या झुल्यावर
माझ्यासोबत झुललेल्या.............
संतोष नार्वेकर.........


आपकी याद सारी रात ना सोने देगी,
आपकी याद सारी रात ना सोने देगी,
पूरी रात तारोंसे बातें होंगी,
पूछेंगे उन तारोंसे क्या तुम्हेभी
हमारी याद इसहितरह आती होगी???.................
संतोष नार्वेकर..............


वड़ाच्या पारमब्यांचं
जमिनीवर प्रेम होतं,
त्या दोघांचं मिलन होऊ नये
म्हणुन वड़ाचं झाड़ वाडत होतं....



तसं सगल्याना नाही जमत
तसं सगल्याना नाही जमत
तुझ्यासारख वागणं,
ओठानवर जरी नसलं
तरी मानत माझं असन.......
संतोष नार्वेकर..........



........या येणा जाणा~या जनिवांची.............
या येणा जाणा~या जनिवांची
मला खुप भीती वाटते,
जाणीव येताना दुख घेवून येते,
आणि जाताना मात्र सुख हिरावून नेते...
संतोष नार्वेकर...........



शब्दांमधूनी गुंतत जावे
मनःपटलावरी शब्द विहरावे
शब्दातीत करूनी संध्या
शब्दगीत ओठी फुलावे

**** अमित वि. डांगे ****


माझ्या कुशीत येणारी प्रेयसी हवी,
चालताना हळूच दचकून
माझ्या कुशीत येणारी प्रेयसी हवी,
प्रेमाच्या या सप्तरंगी वाटचालित
मला तुझी साथ हवी........
संतोष नार्वेकर............