चंद्राशी एकदा बोलताना

Started by Devendra Parte, April 22, 2017, 10:44:34 AM

Previous topic - Next topic

Devendra Parte

चंद्राशी एकदा बोलताना
विषय तुझा निघाला
तुझी स्तुती ऐकुन
चंद्र मला म्हणाला

"कोण रे ही बला
एवढी आवडते जी तुला
सांग मला पण जरा
पाहूदे मला ही एकदा तिला"

तझ्या रूपाचे वर्णन ऐकुन
तो ही चकीत झाला
पण पाहून मात्र तुला
त्यास हर्ष खूप झाला

तुझ्या प्रेमस्पर्शाने जणू
त्याला ही वेड लावले
आता त्यास समजले
माझे मन कोठे हरवले

चांदण्यांचा रूपाने अशीच
रोज भेट तू मला
चंद्रापेक्षाही सुंदर माझ्या चांदणीला
असेच रोज पहायचे आहे मला

            - देवेंद्र पार्टे