झुकझुक गाडी

Started by Asu@16, April 23, 2017, 09:37:42 PM

Previous topic - Next topic

Asu@16

झुकझुक गाडी

बाळ जाते
गावाला
आजी आजोबांना
भेटायला.
तिकीट गेले
काढायला,
झुकझुक गाडीत
बसायला.
टीसी म्हणाला
नो तिकीट
बाळ म्हणाले 
नो फुकट.
वादावादी दोघांची
बघून
झुकझुक गाडी
गेली निघून.

- अरूण सु.पाटील

https://www.facebook.com/AsuChyaKavita