होडी माझा प्रेमाची

Started by कदम, April 24, 2017, 06:18:54 AM

Previous topic - Next topic

कदम


होडी माझा प्रेमाची
रूतुन गळात थांबली

भेट प्रियेची अजुन लांबली
पाउले वाटेवरच अडखळली

लाट उमटली हृदयातून
वेळी कातर झाले आतुर

आत प्रवाहात आले  वादळ
किरणांत सूर्याच्या विक्राळ

काठ लांबच लांब मोठी लाट
अवघड झाली मिलनाची वाट

चिटपाखरूही नाही मार्गावर
भान हरवून झालो अनावर

प्रिये झाले मनात विवर
पाण्यावरच असा आज स्थावर