भास माझे

Started by Rahul Ghorpade, April 24, 2017, 10:37:41 AM

Previous topic - Next topic

Rahul Ghorpade

♥...भास माझे...♥

तु माझ्यासोबत
असण्याचे
भास होते का रे
ह्रदयी भासांचे डोंगर का रे

पाहता दुर तू जवळ
असल्याचा भास का रे
जिकडे तिकडे
तुच दिसण्याचा भास का रे

मला चोरूनी पाहती तु
असा माझा भास का रे
तु माझीचं प्रीत रे अन्
मी तुझाचं मीत रे
असा माझा भास का रे

बाव-या माझ्या मनास
का वाटे ह्रदयी तुझ्या
माझ्याचं साठी प्रेम रे
असा माझा भास का रे

मज भासती अंतरी
तुझ्या प्रेमाची चाहुल
मी तुझा चांद तु जणु
एक चांदण्यांची रात
असा माझा भास का रे

♥....राहुल घोरपडे....♥