आई

Started by आरती बारवाल, April 24, 2017, 06:53:14 PM

Previous topic - Next topic

आरती बारवाल

ती चालायला शिकवते
ती चालायला शिकवते
आणि पडलो कि तीच जवळ पण घेते

ती पाळायला शिकवते
ती पाळायला शिकवते
आणि पाळता पाळता उडायला नको लागुस अस हि तिंच म्हणते

ती बोलायला शिकवते
ती बोलायला शिकवते
आणि वाईट बोलो तर ती कान पण ओढते

ती लिहायला शिकवते
ती लिहायला शिकवते
आणि पान न फाटू देता चुकलेल खोदायला हि तीच शिकवते

ती समाजात राहायला शिकवते
ती समाजात राहायला शिकवते
आणि सामाजिक बधीलकी जपायला हि शिकवते

ती चुकल कि शिक्षा देते
ती चुकल कि शिक्षा देते
आणि बरोबर आल कि शाबासकी हि देते

ती फुलपाखरू सारख स्वचंद राहायला शिकवते
ती फुलपाखरू सारख स्वचंद राहायला शिकवते
आणि मधासारखी गोड माणसे जोडायला हि शिकवते

ती जगायला शिकवते
ती जगायला शिकवते
आणि जगता जगता तोल सुटला हि सांभाळायला हि शिकवते

ती असच शिकवता शिकवता
आपल्याला खूप काही शिकवते
अशी हि आई ची शिकवण कधीच संपत नसते .


- आरती बारवाल  :)