'लहानपणीच्या आठवणी'.....

Started by suraj-123, April 24, 2017, 09:41:18 PM

Previous topic - Next topic

suraj-123

 'लहानपणीच्या आठवणी'...
----------------------------------


जुनं घर ते माझं काैलारु,
कीती गाेंडस-शाेभीवंत दीसतं हाेत.
दारात एक सुंदर लहानंसं,
तुळशी वृंदावन हाेतं.
अंगनात सकालच्या पहारी,
चीमण्या दारात चीवचीव करीत यायच्या.
जणु मला हाक मारण्याची,
चाहुळचं त्या द्यायच्या.
दाणे टाकत त्यांच्याकडे,
मी पाहत बसायचाे.
चाेचीत दाने टीपत,
  त्या भुरंकनं ऊडुन जायच्या......

ते सारं दीसं आजही मला आठवतात.
रम्य ते बालपणाची,
आठवणचं जणु ते घडवतात.
ऊन्हाळ्याच्या सुट्टीत,
आम्ही गाेट्या, लपाछुपी,खेळायचाे.
जंगळात आंबे,करवंदे,जांभुळ खायला जायचाे.
अनं थकुन आलाे तरी,
पुन्हा खेळायला जायचाे.
कड्याक्याच्या उन्हात तहाण-भुक विसरून,
खेळातचं सारं रमायचाे......

फक्त दीवसभरं खेळ अनं खेळं,
याशीवाय दुसरं काहीचं नाही सुचायचं.
आईचा आवाज कानावर पडला की,
थाेडं घाबरल्यासारखं व्हायचं.
अनं हळुचं घराच्या,
मागच्या दारानं आत शीरायचं
असं माझं राेजचं चालायचं......

आईचा आेरडाही राेजचं पडायचा.
अनं मधुन-मधुन कधी,
आईचा-बाबांचा मारही खावा लागायचा.
राञीच्या वेळी अंगणात,
खाटावर नीवांत पडायचं.
आकाशातले चंद्र-तारे पाहुन,
तेथे जावयासं वाटायचं.....

थंडगार हवा चाेहीकडुनं वाहायची.
अनं,मला अचानक गाढ झाेप लागायची.
आज सारं पुन्हा आठवलं.
     असं वाटतं ते पुन्हा अनुभवायला मिलावं.
      आजच्या काळात सारचं जणु बदललं.....
                  -ज्ञानेश्वर अशाेक थाेरात.
                 (९०७५८३८३५४)
                     (ता.-मुरबाड,जि.-ठाणे.)