मंद मंद वा-यात

Started by कदम, April 25, 2017, 07:35:33 AM

Previous topic - Next topic

कदम


मंद मंद वा-यात,सुगंधीत निरोप
शहारे देत तनास, भरत मनात हुरूप

विरहाची सावली, पाठमोरी कुरूप
बदलते क्षणात, घेते सुंदरशे स्वरूप

सांगावा आसतो त्यात,भेटीचा सुगावा
सांगतच वाहते जणु,धीर धरा नाखवा

वा-यातील गारवा ,तनाशी भिडावा
मोहरून आठवांना ,देह तुजसाठी रडावा

रंग ऋतुने बदलावा,गाल आसवात भिजावा
अन् म्हणावं झंझावातानं, का रे दुरावा ?!