मोक्षयोग

Started by शिवाजी सांगळे, April 26, 2017, 11:51:39 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

मोक्षयोग

स्वरात बासरीच्या तो आर्त भाव होता
गालात हासतांना डोळ्यात थेंब होता

नेत्रात पाडसाच्या व्याकूळ भाव होते
शोधात पारधी तो ठेऊन नेम होता

शाश्वत केशवाचे भाळात गोंदलेले
पादांगुष्ठ हरीचे वेधीत तीर होता

भोगात प्रारब्धाने राधेय बांधलेला
देवून बाण गेला तो मोक्ष योग होता

सांगून श्रीहरीने गीता रणांगनी ती
श्रेष्ठच पाठ द्याला जो ज्ञानयोग होता

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९