रोजनिशी

Started by पल्लवी कुंभार, April 27, 2017, 02:17:18 PM

Previous topic - Next topic

पल्लवी कुंभार

अशी एक रोजनिशी
रोज एक कोरा कागद
त्यावर उमटतील अलवार शब्द
नितळ शब्दांत तरळतील भावना
भावनांत गवसेल सूर निराळा
मिळेल अर्थ उकलता प्रश्नांना
उमगेल वाट सुप्त विचारांना
मिळेल बोध करता कर्माचा
उतरेल शब्द कागदी अनुभवाचा
घेऊन आनंद जीवनी नवरसांचा
मांडावा लुप्त कोपरा अंतरीचा
लेवून मागोवा अंतरंगीचा
घ्यावा ध्यास रोजनिशीचा