आठवण

Started by Rahul Ghorpade, April 28, 2017, 05:12:44 PM

Previous topic - Next topic

Rahul Ghorpade

व्याकुळ झालं ग सखे
आज माझं मन
तुझ्या त्या
फितुर आठवणीत

डोळ्यांतुन वाहती
आज माझ्या
आठवणींचे पाझर
ह्रदयात जाग झालं ग
सखे आज माझ्या तुफान....

तु येना सखे वा-याची
एक झुळूक होऊन
सावरायला मला
वा-याची एक झुळूक होऊन....

बहरूनी आली ही सांज
तुला पाहुनी पावसात
मन गेल गं सखे माझं भिजून
हळूवार आलं पाणी गं डोळ्यात...

♥....राहुल घोरपडे....♥