शेवट

Started by Neha mhatre, April 28, 2017, 07:46:18 PM

Previous topic - Next topic

Neha mhatre

नव्हते प्रेम तुझे ना मग
का खेळ मांडला...
माझ्या ख-या प्रेमाचा का
असा शेवट केला...

वचने मला देऊन
संसार दुसरी सोबत मांडलास ...
माझ्या संसाराच्या स्वप्नांना
उध्वस्त करून गेलास...

नव्हतेच निभावायचे नाते तुला
तर का जीवनात आला..
चेहऱ्यावरच्या हसू ला का
अश्रूत बदलून गेला...

माहीत नव्हतं मला तुला
ख-या प्रेमाची कदर नाही...
जीव तोडून प्रेम केल इथेच
थोडी चुकी झाली..

नेहा म्हात्रे
२८/०४/२०१७