॥आज माझी बाहुली मला ओळखेनाशी झालीय ॥

Started by siddheshwar vilas patankar, April 28, 2017, 08:37:10 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar



आज माझी बाहुली मला ओळखेनाशी झालीय

मी तोच तिच्यासंगे लपाछुपी खेळणारा

मी तोच जो तिच्यासाठी कधी हत्ती कधी माकड बनणारा

आज तिच्या अनोळखी नजरांमुळे, छाती भरून आलीय ॥

आठवतंय तुला का ? तो बांधलेला झुला

खिळा मारताना झाला हात रक्ताळेला

तू दुडूदुडू धावलीस लेप शोधण्यासाठी

तुझी तळमळ बघुनी , धरली जखमेस खपली ॥

तुला काय देऊ नि तुला कुठे ठेवू ?

दिनरात होतो मी मग्न विचारात

तू दृष्टी तू सृष्टी या दिन नेत्रांची

असा काय अपराध घडला कि पडलो अंधारात ॥

मी बाप कि पाप , हा प्रश्न आता पडतो

तुझ्या आठवणीने आता कंठही सुकतो

नको बाळा नको वागू अशी तू माझ्याशी

तुझ्या वाणीस हे कान तळमळलेले,

पुन्हा बोल "बाबा" , ये जवळी उशाशी ॥


सिद्धेश्वर विलास पाटणकर C
सिद्धेश्वर विलास पाटणकर C