कित्येक ओळी

Started by Kumar Sanjay, April 29, 2017, 08:00:52 AM

Previous topic - Next topic

Kumar Sanjay

खोलवर समुद्रात मिळावे
माझे निर्मोही पाणी
कळु नये कुणाला
दुःखाची विराण कहाणी

वाहून गोठले प्रवाह
व्याकूळ डोळ्यांवर
रंग उदास होते
मरणार्या मिटत्या देहावर

ओंठावर मोैन बांधून
श्वास चुकला अवेळी
एंकाकी ओंजळीत होत्या
स्मरणाच्या कित्येक अोळी

# कुमार संजय