कधी भेटणार तु पुन्हा

Started by Dnyaneshwar Musale, April 29, 2017, 11:56:47 PM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

सांजवेळी कोऱ्या
होऊन जातात खुणा
कधी भेटणार तु
एकदा सांग पुन्हा.

तु कानात गुंजत जावे
जणु गात आहे  विना
शब्दांत गुतूंनी वेड
लावुन तु जाते मना.

बडबडीची तु असे
नुसताच तुनतुना
आडमोहरी तु होतास
दिस जातो ग माझा सुना सुना.

केसात ओवुन घेतेस
बऱ्याच तु रंगबिरंगी अशा पिना
अंगणी ओसांडून यावे
रोज बनुन तु  घना.

रानवाटा मजला झाल्या
एकट्या
तु  आता  एकदा थांबना,
नको दुर जाऊस
सांग तु
आता भेटणार कधी पुन्हा.

कळीस जपावे यात
कुठला सांग तु मोठा असा गुन्हा
विस्कटलेल्या पाकळ्या
कधी एकवटणार सांग तु पुन्हा.